कर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र ...... सकाळी ७ वाजताचा गजर नेहमीप्रमाणे धडाडला ... प्रतीक डोळे चोळत चोळत उठायचा प्रयत्न करत होता .... इतक्यात आईने हाक मारली .... "उठलास का रे प्रतीक ... आज Geometry चा पेपर आहे ना .... चाल आवर पटापटा ... एखादी रिव्हिजिन होईल पटकन" .....
Geometry म्हणल्यावर प्रतिक ची झोप एकदम उडाली. आज Geometry ! उद्या चित्रकला आणि कार्यानुभव झाले कि मग परीक्षा संपलीच ..... दिवाळी ची सुट्टी सुरु ..... आणि यावर्षी प्रतीक आणि त्याच्या सोसायटी मधल्या सगळ्या मित्रांनी मिळून एक नाही तर दिवाळीचे दोन किल्ले बनवायचे ठरवले होते .... एक तर राजगड आणि दुसरा .... दुसरा काय ठरत नव्हता ... पण जाऊदे आधी परीक्षा तर संपूदे ....
Geometry चा पेपर झाला ! चित्रकलेला तसाही कोण अभ्यास करत नाही पण उगाच खाली जायचा हट्ट केला तर आईकडून ऐकून घ्यावे लागेल म्हणून प्रतीक घरीच थांबला. चित्रकला आणि कार्यानुभव कसेबसे संपवले आणि जो घरी निघाला तो शाळेच्या सर आणि मॅडम ना हॅपी दिवाली वैगेरे म्हणायला पण थांबला नाही ...
घरी आला तोच प्रतीकला छान काहीतरी तळण्या चा वास आला. त्याला ओळखायला फार वेळ लागला नाही कि आपल्याच घरी आज चकल्यांचा बेत आहे. चकल्यांच्या दोन बरण्या भरून टेबल वर ठेवल्या होत्या. त्यातल्या एका बरणीत हात घालून हाताला लागतील तेवढ्या चकल्या त्याने काढून घेतल्या आणि पळाला ते थेट कपडे बदलायला. कारण खाली अमेय, श्रुती आणि मोहित त्याची वाट पाहत होते. आज महत्वाची मीटिंग होती. कारण आज किल्ल्याच प्लांनिंग करायचा होतं !
सगळ्यात महत्वाचा म्हणजे किल्ल्यासाठी जागा. मागच्या वेळी B बिल्डिंग च्या पुढे बनवला आणि जोगळेकर काकूंनी एव्हडा दंगा केला. काय तर म्हणे कि त्यांच्या मुलाने नवीन गाडी घेतली आणि तिथे लावायची होती. दंग्याच्या दुसऱ्या दिवशी किल्ल्याची थोडी पडझड झाली होती, नवीन गाडी धडकली असणार बहुदा. म्हणून यंद्याच्या किल्ल्याची जागा आजच्या आज ठरवायची होती. रोहन म्हणत होता कि D बिल्डिंग च्या पलीकडे नवीन बिल्डिंग चा काम चाललंय, तिथून थोडी माती, वाळू आणि दगड वैगेरे मिळू शकतील. पण तिथे कोणी अडवायला नको फक्त. बाकी माती लिंपायला एखादा पोतं तर घरातूनच मिळेल ...
A आणि B बिल्डिंग च्या मध्ये थोडा मागे एक जागा प्रतीक ने हेरून ठेवली होती. एक काय पण दोन छान मोठे मोठे किल्ले आरामात होतील अशी जागा होती ती. प्रतीक च्या मनात सहज विचार आला - शिवाजी महाराज पण अशीच शोधात असतील का जागा किल्यांसाठी. स्वतःशीस हसून प्रतीक पटकन A बिल्डिंग च्या जोशी काकांच्या घरी झेपावला, कारण ती जागा त्यांच्या पार्किंग ची होती. त्यांचीच परमिशन तर काढायला पाहिजेच ना ....
कालचा प्लॅन तरी पूर्ण झाला, जागा सापडली होती .... आज शनिवार, म्हणजे बजरंग बली कि जय म्हणायचं आणि आज माती, वाळू आणि दगड गोळा करायचेच होते. सकाळी सकाळी गरमागरम इडल्या खाऊन प्रतीक खाली आला आणि सायकल बाहेर काढली. अजून उन्मेष आणि रघु पण सायकल आणणार होते. आज त्या बिल्डिंग च काम बघणाऱ्या काकांना मस्का मारायचा होता. सगळ्यांना जरा टेन्शन होत पण काका तर भारीच निघाले ... माती, वाळू तर दिलेच पण सोबत १० विटा पण दिल्या ... किल्ल्याच्या तटबंदीची सोय झाली होती ......
दगड रचले, पोत्यावर माती लिंपली, ओली आहे तोपर्यंतच पटकन पोतं पसरून टाकायला जरा गडबडच झाली ... पण सगळं जमलं नीट ... एकदा जरा माती सुकली कि संध्यकाळी एक चक्कर टाकू असा म्हणून सगळे परत घरी गेले ... संध्यकाळी उन्मेष आठवणीने हळीव घेऊन आला होता. आज बिया टाकल्या कि परवा म्हणजे छोटी छोटी पानं आलीच म्हणून समजा ....
रविवारी किल्ल्याच्या डेकोरेशन चा काम सुरु झालं. श्रुती चा ड्रॉयिंग चांगलं म्हणून मातीच्या रंगाचे बुरुज पेपर वर काढून पुठ्य्या वर चिकटवून आणायचं काम तिचं. रघु कडे बऱ्यापैकी मावळे चित्रं होती, शिवाजी महाराज तर अगदी सुरेखच ! प्रतीकला नेहमी हसू यायचं ते मावळे बघून, ससा आणि त्याच्या बाजूचा मावळा एकाच आकाराचे कसे काय असू शकतात, तीच गोष्ट किल्ला उतरणारी हिरकणी आणि जवळच्या जंगलात असणाऱ्या वाघाची !
उन्मेष आणि रोहन तटबंदीच्या कामात लागले होते. थोडा हलका खड्डा खणला, किल्ल्याच्या बाजूबाजूने, ते झाले खंदक, त्याच्या आतल्या बाजूला विटा लावून केलेली तटबंदी. विटांना माती थापलेली जेणे जेणे करून एक्दम मजबूत भिंतीसारखंच वाटेल. एक एक गोष्ट चढली किल्ल्या वर तसा किल्ल्याचा दिमाख ओळखू येऊ लागला ... आज काही करून किल्ला पूर्ण करायचा होता .... सोमवारी धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी किल्ल्यावर पणती लावून एक तरी लवंगीची माळ उडायाचीच होती समोर ......
नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन एकाच दिवशी होतं, त्यामुळे सगळ्या मुलांना घरीच कामं नेमून दिली होती, कुणी हार करत होता, कुणी रांगोळी काढत होते, कुणी आंब्याची पानं आणायला बाहेर पडले होते तर कुणी घरातल्या पूजेची मांडामांड करण्यात मदत करत होते. लक्ष्मी पूजन झालं आणि मग काय मुलांना कळ निघेना. सगळ्यांना कधी एकदा आई बाबा खाली येऊन आपला किल्ला बघायतात असा झालं होतं .... आपल्या मुलांनी मेहेनतीने केलेला किल्ला बघायला सगळे आई बाबा पण आतुर होतेच ...
"राजगड" - किल्ल्यावर लावलेला तो बोर्ड अगदी दिमाखात किल्ल्याची ओळख करून देत होता. हळिवाची शेती किल्ल्याच्या दऱ्यांवर पसरली होती. मावळे अतिशय हुशारीने गस्त घालत होते. किल्ल्याच्या बुरुजावर चोहो दिशांना सलामी देणाऱ्या तोफा कधीही उसळायला तयार होत्या. एका गुहेमध्ये रामदास स्वामी आसनस्थ झाले होते. स्वराज्याच्या पुढच्या मोहिमाना जणू आशीर्वाद देत होते ...
तटबंदीच्या आतमध्ये किल्ल्याच्या पायथ्यशी एक छोटे गाव वसले होते, गावात चार दोन घरं होती. एका घराच्या बाजूला एक विहीर होती. गावापासून थोडा लांब गर्द झाडांच्या मध्ये एक ससा खेळात होता. त्या सशाच्या थोडं वरतीच हिरकणी आपल्या पिल्ल्याला भेटायच्या निर्धारानं त्या कड्यावरून उतरत होती ...
तटबंदी वर पणत्या लावल्या होत्या, ज्याच्या प्रकाशात मावळे टेहेळणी करत होते. किल्ल्याच्या प्रवेश द्वारापाशी दोन तोफा, "काली" आणि "भवानी", येणाऱ्या शत्रूला स्वराज्याचं पाणी पाजायला एकदम तयार होत्या ....
भरपूर पणत्या लावल्यामुळे किल्ल्यावर पण एकदम दिवाळीची शोभा पसरली होती. शिवछत्रपति अगदी जणू राज्याभिषेकासाठी तयार झाले होते. सेनापती आणि प्रधान अश्या मोजक्या मंडळींसह पुढच्या योजनांचा आराखडा बांधत होते. आता कोणत्याही क्षणी "हर हर महादेव" चा पुकारा होईल आणि हजारो मावळे तीच गर्जना आसमंतापर्यंत पोहोचवतील असे वाटत होते ...
दृष्ट लागेल असा किल्ला बघून सगळ्या आई बाबाना भरून आला होतं ... प्रतीकांच्या बाबांच्या डोळ्यात क्षणभर आनंदाश्रू तरळले ... त्यांना या सगळ्या वानर सेनेचा अभिमान वाटत होता .... रस्त्यावर चौकाचौकात विकायला बसलेल्या, काळ्या रंगात रंगवून त्यावर चमकी पसरलेल्या, आखीव रेखीव पायऱ्या असलेल्या आणि काही शे रुपयांना विकत मिळणाऱ्या त्या निर्जीव किल्ल्याला मुलांनी साकारलेल्या या राजगड किल्ल्याच्या नखाची देखील सर नव्हती .....