अच्छे काम के पहले कुछ मीठा हो जाये चा ज़माना आहे आजचा. त्यामुळे माझ्या या मराठी प्रकरणाची सुरुवात पण काहीतरी गोड लिहून करावी असे वाटले। नुकताच माझ्या आजीचा सहस्रचंद्रदर्शन चा सोहळा पार पडला अणि तिथे मी माझ्या अल्प मतिप्रमाणे अभिप्राय व्यक्त करण्याचा प्रयत्न केला। गोडा बरोबर कनेक्शन असं की लहानपणी पासूनच प्रत्येकाने आजीच्या हातचे गोड पदार्थ ताव मारून खाल्लेले आहेत। तर अश्या गोड आठवणींना उजाला देणाऱ्या आजीच्या सहवासाबद्दल माझे हे चार शब्द, बघा कसे वाटतात, अभिप्राय नक्की कळवा .....
गणपतीचे स्मरण करतो आणि सर्वाना नमस्कार करतो.
माझे ना दरवर्षी असे होते, जून महिन्याचे पान फिरवून कॅलेंडर मध्ये जुलै महिन्याचे पान दिसले कि २९ जुलै ची तारीख दिसते आणि मनात नेहमीच घर करून असणारी अप्पांची आठवण एक्दम मूर्त स्वरूप धारण करते. वास्तविक २९ जुलै हा अप्पांचा पुण्य स्मरण दिवस, पण त्या दिवशी त्यांच्या आपल्यात नसण्याबद्दल जेवढा वाईट वाटतं त्यापेक्षा जास्त अभिमान या गोष्टीचा वाटतो कि ते माझे आजोबा आहेत. पण अप्पांची एकट्याची आठवण येणं शक्यच नाही, कारण जिथं जिथं अप्पा तिथं तिथं अनुआजी आहेच.
आजी, काय रसायनं असतं हो हे आजी म्हणजे. इतिहासने आई या पात्राला खूप मोठा केलंय, पण आजीला मात्र फार कमी वेळा आठवलं गेलंय. जिजाबाई शिवाजी राजांची आई म्हणून लोकांना माहित आहेत पण स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजांची आजी म्हणून खूप कमी लोक ओळखतात. राजकारणाचे जे धडे नानासाहेब पेशव्यांना त्यांचे वडील बाजीराव पेशव्यांच्यांकडून मिळाले त्याच तोलामोलाचे धडे त्यांना त्यांच्या आजी राधाबाई यांच्याकडून मिळाले. अर्थात, देशाची पहिली महिला पंत प्रधान, इंदिरा गांधी, आजी म्हणून फार कधी प्रभावी नातवंडं घडवू शकल्या नाहीत हि गोष्ट वेगळी.
तर मुद्दा काय, आजीला थोडा फुटेज कमीच मिळालेलं आहे.
अनु आजी बाबत थोडं असाच काही आहे, आज माझ्या पिढीसाठी एक प्रेमळ आजी म्हणून आणि माझ्या आई बाबांच्या पिढी साठी तितकीच प्रभावी आणि कणखर, आई, मामी, काकू आणि आत्या म्हणून अनु आजी आपल्या सगळ्यांना आधार देत आली आहे. पण पाश्चात्य संस्कृती सारखं कुठला तरी एक दिवस काढून आणि त्याला ग्रँड Mothers डे असा म्हणून त्या दिवशीच थँक यु म्हणणं आपल्याला जमणार नाही. कारण आपल्या mothers आणि grand mothers यांचं कामच एव्हडं मोठा आहे. एक संपूर्ण पिढी घडवणं आणि त्यांच्या संस्काराचा पाया पक्का करून घेणं हे काही येऱ्या-गबाळ्याचं काम नाही.
अनु आजी कडून मी बरंच काही शिकत आलोय आणि या पुढेही शिकत राहीन. पण तिचा एक गुण जो सगळ्यांनी अतिशय आत्मसात करण्यासारखा आहे तो म्हणजे - शांतता आणि स्थिरता. वरपांगी थोडा सोपा वाटणारा हा स्वभाव दररोज आचरणात असणे हि कठीण गोष्ट आहे. आज पर्यंत मी तिला एकदाही चिडलेलं पहिला नाही कारण अत्त्यंत स्थिर असाच तिचा स्थायी भाव आहे. दुसरा महत्वाचा गुण म्हणजे कुठल्याही परिस्थितीचा सर्व बाजूनी विचार करून मगच त्याबाबत काही हालचाल करणे. याला थोडी तिची कर्क राशी कारणीभूत असणार बहुदा, यामुळे तिला कदाचित एखादा decision घायला थोडा जास्त वेळ लागेल पण तो सारासार निर्णय असणार यात शंका नाही.
अजून एक गोष्ट जी मला प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आमच्या पिढीचं थोडं नुकसान असा होणार आहे ना कि आम्हाला आपली जी शास्त्र पुराण आणि ग्रंथ आहेत त्यांना समजून घेण्यात योग्य मार्गदर्शन मिळणं खूप कठीण आहे. आणि याच बाबतीत अनु आजीचा अभिमान वाटावा अशी बाब म्हणजे तिचा आपल्या पुराणांबाबतचा सखोल अभ्यास. आणि तिचा हा अभ्यास एखादं पुस्तक वाचून किंवा काही कोर्सेस करून बनलेला नाही तर तिने सातत्याने केलेल्या उपासनेच्या पायावर तो बनलेला आहे. हे तिचं परम भाग्य म्हणावं लागेल कि तिला भागवत सप्ताह आणि दासबोध, ज्ञानेश्वरी यांचे सप्ताह अटेंड करता आले आहेत.
माझ्या वाचनात एकदा खूप चांगला लेख आला होता. त्याचा सार असा होता कि - आत्ता पर्यंत या पृथ्वीवर ४ युगं झाली आहेत, आणि चांगलं आणि वाईट यांची लढाई प्रत्येक युगात होत आली आहे. सत्य युगं मध्ये हि लढाई देव आणि दानव यांच्यात झाली - देव स्वर्गात होते आणि दानव पाताळ मध्ये. म्हणजे त्यांच्यात खूप जास्त अंतर होतं. हेच त्रेता युगात राम आणि रावण पृथ्वीवर वेगवेगळ्या खंडात होते. द्वापार युगात महाभारतात हेच चांगलं वाईट युद्ध एक घरात भावाभावांमध्ये झालं. आणि आजच्या काली युगात हेच दानव आपल्या प्रत्येकाच्या मनात आहेत. त्यामुळं आजचं युद्ध ये प्रत्येचा स्वतःशीच आहे. तर मग या अवघड अशा द्वंद्वा मध्ये, जिथे आपलेच नेगेटिव्ह विचार आपल्याला त्रास देतात, त्यामुळे निर्णय घेणे अवघड होऊन बसते, आपण जिंकणार कसे. मला तरी एक सोपा उपाय सापडलाय. माझ्या मते जेव्हा जेव्हा माझ्या मनात असे द्वंद्वा चालेल, तेव्हा तेव्हा मी असा विचार करावा कि आज अप्पा असते तर त्यांनी मला काय सल्ला दिला असता आणि जर मी माझ्या मनाची स्थिती जर आजीला सांगितली तर ती मला काय सांगेल आणि काय निर्णय घेऊ देईल. अप्पा आणि आजीचे हेच उपदेश जर मी ऐकत राहिलो तर या द्वंदात मी कायमच जिंकत राहेन.
अनु आजी, तू ग्रेट आहेस ! तुला खूप उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो, आम्हाला कायमच हवाहवासा वाटणारा तुझा सहवास आम्हा मुलाबाळांना, नातवंडांना आणि आता तर परतवंडानाही कायम लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.